सबका मालिक एक.. खरंच तो एकच. आज कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ही विलक्षण गोष्ट जाणवली…तो एकच तेव्हाही आणि आत्ताही. दोन महिन्यांन पूर्वी बातमी आली की शिर्डित बाबांच्या द्वारकामाईत भिंतींवर भक्तांना बाबा दिसत आहेंत. लागलीच गेलो. अनेकांचे अनुभव ऐकले , प्रत्यक्ष पाहिलं आणि लक्षात आला की समोरच्या लाईट मुळे बाबांचा चेहरा भिंतींवर उमटलाय असं वाटत होतं. काहीतरी वेगळं करावं म्हणून शांत बसलो आणि कल्पना सुचली. आमचे स्थानिक प्रतिनिधि मनोज गाडेकर यांना म्हटलं एक छानसा चित्रकार द्या पटकन . भिंतीवर बाबा ज्याने पाहिले त्या भक्ताला घेउन त्या चित्रकाराचा साई बाबा मंदिरा बाजूलाच असलेला स्टुडिओ गाठला. चित्रकार यायचा होता म्हणुन तोवर त्यांची आर्ट गॅलरी पाहिली आणि भारावून गेलो. साईबाबांच्या आयुष्यातील भक्तीने ओथंबलेले अनेंक प्रसंग ह्या अवलियाने आपल्या चित्रकलेने कॅनवासवर अक्षरशः जिवंत केले होते. कांही वेळात तो अवलिया चित्रकार आला आणि इतक्या वर्षांनी बाबांनी मला शिर्डित का पाठवलं ह्याचं उत्तर मला सापडलं .
ह्या चित्रकाराचं नाव. हेमंत वाणी. उच्च शिक्षण झालेल्या हेमंतने लाखांत पगार असलेली एँड एजन्सी मधील नोकरी सोडली आणि बाबांची पेंटींग्स करू लागला. पदरचे लाखो रुपये खर्च करूनही म्हणावं तसं यश मिळत नव्हतं. आणि एक दिवस बाबांनीच एक विलक्षण कलाकृती त्याच्या हातून करून घेतली. ‘ The Blessing Eyes ‘ आणि हेमंतची अपार मेहनत आणि त्या ईश्वराची कृपा की आता हेमंतच्या यशाचा आलेख चढताच आहे आणि सदैव राहिल. हेमंतने त्याच्या ह्या चित्राचं पेटं करून घेतलय आणि जगभरातील अनेक देशांमध्ये हे चित्र पोहोचलं आहे. शिर्डित गेलात तर मंदिरा शेजारीच असलेल्या या आर्ट गॅलरीला आवर्जुन भेट द्या. तेथे बाबाही भेटतील आणि इतका जगविख्यात कलाकार असूनही अत्यंत साधा आणि सज्जन असलेला बाबांचा भक्त हेमंतही.
आज हे लिहायचं प्रयोजन की आत्ताच नविन ऑफिसमधे शिफ्ट झालो आहे आणि कृष्ण जन्माष्टमीच्या या दिवशी, मी शिर्डिहून निघताना हेमंतने आत्यंतिक प्रेमाने दिलेली अमूल्य भेट आमच्या डेस्कवर ठेवली आहे. कित्येक युगे येतील कल्प येतील जातील पण या ईश्वराच्या प्रत्येक जन्मात रूपात एक गोष्ट मात्र कधीच बदलत नाही आणि ती म्हणजे त्याचे अकारण कारूण्याने भरलेले डोळे.
आणि योग असा की सकाळीच माझ्या भगवंताचे त्रिविक्रमाचे डोळे पाहताना या ओळी त्यानेचं लिहून घेतल्या.
डोळ्यांतून झरते त्याच्या. प्रेमाची अविरत गंगा.
तो राम घननीळा होता. तो कृष्ण सावळा होता.
वैभवसिंह.
।। नाथसंविध् ।।
Dear Hemantji,
Please confirm do you oversea shipment to New Zealand?
Kind Regards
Suresh